Homeनाशिक लोकलएसएमबीटी हॉस्पिटलच्या आरोग्यसाधना शिबिरातील रुग्णसेवेची दशकपूर्ती

एसएमबीटी हॉस्पिटलच्या आरोग्यसाधना शिबिरातील रुग्णसेवेची दशकपूर्ती

नाशिक | दि.०४ प्रतिनिधी

उपचारांच्या गुणवत्तेत कुठलीही तडजोड न करता सर्वसामान्यांना मोफत तसेच कमीत कमी खर्चात दर्जेदार उपचार मिळावेत या हेतूने सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आरोग्यसाधना शिबिरास नुकतीच सुरुवात झाली. या शिबिरांतर्गत शासकीय योजनेत बसणाऱ्या सर्व प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जात आहेत. शिवाय, शासकीय योजनेत न बसणाऱ्या रुग्णांवर औषधे व इतर तपासण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून गुणवत्तापूर्ण उपचार करण्यात येत असल्याची माहिती हॉस्पिटलचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सचिन बोरसे यांनी दिली.

पुढे माहिती देताना बोरसे म्हणाले की, समाजातील हजारो रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयात शासकीय योजनेच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येत आहेत. मात्र, आजही योजनेत समाविष्ट नसलेल्या आजारांचा खर्च मोठा असल्याने अनेक रुग्ण उपचारांपासून वंचित राहतात.उत्तम गुणवत्तापूर्ण रुग्णसेवा गाव-पाड्याच्या अखेरच्या घटकापर्यंत पोहचावी, सर्वांना दर्जेदार उपचारांचा लाभ मोफत आणि अत्यल्पदरात मिळावा यासाठी या आरोग्य शिबिराची पुनश्च घोषणा करण्यात आली आहे. यानुसार एसएमबीटी हॉस्पिटलमधील रुग्णांसाठी हॉस्पिटलची फी, डॉक्टरांची तपासणी फी, नर्सिंग चार्जेस, बेड चार्जेस, भूलतज्ञांची फी, ऑपरेशन (ओटी) चार्जेस आणि जेवण इत्यादी सुविधा मोफत करण्यात आल्या आहेत. रुग्णांना केवळ अत्यल्प दरातील रेडीओलॉजी, रक्ताच्या तपासण्या आणि सवलतीतील औषधांचा खर्च करावा लागणार असल्याचे सचिन बोरसे यांनी सांगितले.

इगतपुरी तालुक्यातील सिन्नर-घोटी रस्त्यावरील नंदी हिल्स येथे असलेल्या ‘एसएमबीटी हॉस्पिटल’मध्ये विविध आजारांवरील उपचार मोफत होतात. १२०० बेडची क्षमता असलेल्या या हॉस्पिटलमध्ये ३७० पेक्षा अधिक अनुभवी डॉक्टर्स पूर्णवेळ सेवा बजावत आहेत. २०० पेक्षा अधिक आयसीयु बेड्स उपलब्ध आहेत, प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र ओपीडी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेले १७ मॉड्यूलर ऑपरेशन थियेटर्स, लहान मुलांसाठी पीआयसीयु, एनआयसीयू उपलब्ध आहेत, २४ तास उपलब्ध असणारा अतिदक्षता अपघात विभाग, अत्याधुनिक कॅथलब आणि कार्डियाक ओटी,रुग्णांच्या नातेवाईकांसाठी रुग्ण समन्वयक यांचे पूर्णवेळ मार्गदर्शन, हॉस्पिटलचा स्वच्छ व विस्तीर्ण परिसर यामुळे महाराष्ट्रातील महत्वाचे आरोग्य उपचार केंद्र म्हणून एसएमबीटीकडे बघितले जात आहे.

याठिकाणी हृदयविकार आणि हृदयविकार शस्रक्रिया, कर्करोग आणि कर्करोग शस्रक्रिया, मेंदू आणि मणकेविकार, पोटविकार, दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया, मूत्ररोग, अस्थिरोग, कान-नाक-घसा, मुत्रपिंडविकार मधुमेह-उच्च रक्तदाब, स्त्रीरोग, लहान मुलांचे आजार, त्वचारोग, दंतरोग, उच्च तंत्रज्ञानाद्वारे व्हेरीकोस व्हेन्स शस्रक्रिया, मोतीबिंदू शस्रक्रिया, तिरळेपणा शस्रक्रिया, संततीची शस्रक्रिया तसेच गरोदर मातांशी सलंग्नीत सोनोग्राफी व रक्त तपासण्या, मानसिक आजार यावर गुणवत्तापूर्ण उपचार याठिकाणी उपलब्ध आहेत. याठिकाणी २६ पेक्षा अधिक सुपर स्पेशालिटी आणि स्पेशालिटी सेवा एकाच छताखाली उपलब्ध असल्यामुळे उपचारांसाठी रुग्णांना सर्व प्रकारचे पर्याय रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.

यासोबतच, एसएमबीटी कॅन्सर इन्स्टिट्युट येथे अतिविशेष कॅन्सर उपचारासाठी असलेल्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कार-टी सेल थेरपी यासुविधा उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, मूत्रपिंड प्रत्यारोपण मोफत केले जात असून मागील सहा महिन्यात ६ रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. समृद्धी महामार्ग सुरु झाल्यामुळे मुंबई उपनगर, ठाणे कल्याणसह वैजापूर, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम परिसरातील रुग्णांना एसएमबीटी हॉस्पिटलपर्यंत येणे सोपे आणि सोयीस्कर झाले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेऊन निरोगी जीवनशैली अंगीकारावी असे आवाहन हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.

आरोग्यसाधनेने ग्रामीण आरोग्य सुधारेल

आरोग्यसाधना शिबिरात एसएमबीटी हॉस्पिटलच्या वतीने शासकीय योजनेत न बसणाऱ्या शस्रक्रिया मोफत करण्यात येत आहेत. रुग्णांना केवळ अल्पदरात तपासण्या, औषधांचा खर्च येईल. या शिबिरात हॉस्पिटलच्या वतीने हॉस्पिटल फी, डॉक्टर फी, नर्सिंग चार्जेस , बेड चार्जेस, भूलतज्ञ फी, ऑपरेशन चार्जेस, जेवण पूर्णपणे मोफत करण्यात आले आहे. शिवाय रुग्णांच्या नातेवाईकांना निवाऱ्याची व्यवस्था उपलब्ध आहे. या शिबिरात रुग्णांना हॉस्पिटलमध्ये अत्यल्प दरात रेडीओलॉजी, रक्ताच्या चाचण्या आणि औषधे उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

डॉ. मीनल मोहगावकर, अधिष्ठाता, एसएमबीटी हॉस्पिटल

‘एसएमबीटी’ला दहा जिल्ह्यांची कनेक्टिव्हीटीनागपूरपासून-आमणेपर्यंत समृद्धी महामार्ग सुरु झाल्यामुळे दहा जिल्ह्यांची कनेक्टीव्हीटी एसएमबीटी हॉस्पिटलशी झाली आहे. यात ठाणे, अ.नगर, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशीम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. गेल्या काही दिवसांत या दहा जिल्ह्यातील शेकडो रुग्णांवर उपचार करण्यात हॉस्पिटलला यश आले आहे. विशेष बाब म्हणजे, हृदयविकार शस्रक्रियेतील क्लिष्ट कॉम्प्लेक्स कार्डियाक प्रोसिजर्स, किडनी ट्रान्सप्लांट, बोन मॅरो ट्रान्सप्लांट, कार-टी सेल थेरपी सारख्या अद्ययावत उपचारांचा यात आकडा मोठा आहे. यासोबतच हॉस्पिटलच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आरोग्यरथ बससेवेमुळे संगमनेर, कसारा आणि नाशिकहून थेट रुग्णांना एसएमबीटी हॉस्पिटलच्या सेवा घेणे शक्य झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!