Homeअपघातमुंबई अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात इंटरनॅशनल शूटर शिवाजी पाटील मृत्युमुखी

मुंबई अहमदाबाद मार्गावर भीषण अपघात इंटरनॅशनल शूटर शिवाजी पाटील मृत्युमुखी

पालघर (मुंबई) : पुण्याहून गुजरातकडे जात असताना मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. मनोरजवळ भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार एका जड वाहनाला धडकली. या भीषण अपघातात आंतरराष्ट्रीय निशानेबाज संभाजी शिवाजी पाटील (वय २७) यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्यासोबत असलेले यश प्रशांत चौधरी (वय २२) गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात इतका भीषण होता की फॉर्च्युनर कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. प्राथमिक माहितीनुसार कार प्रचंड वेगात होती. धडकेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमी यश चौधरी यांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, वेग आणि निष्काळजी वाहनचालना यामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. संभाजी पाटील यांच्या अकाली निधनाने क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!