नाशिक लोकल : सतिश रुपवते : दिव्यांग बांधवांसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती च्या वतीने दिव्यांग सक्षमीकरण सोहळा आयोजित करण्यात आला. सदर सोहळा खेडगाव, तालुका दिंडोरी येथे नागरिकांच्या उत्तम प्रतिसादात आणि दिव्यांग बंधूंच्या भावनिक प्रतिसादामध्ये सोहळा पार पाडण्यात आला.
सदर सोहळ्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस अमोलभाऊ भागवत उपस्थित होते, त्यांच्या पुढाकारातून हा सोहळा संपन्न झाला, तसेच जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गांगुर्डे, जिल्हा परिषद सदस्य संजय पगारे, नगरसेविका स्नेहा जाधव, खेडगाव रुग्णालय वैद्यकीय अधिकारी राखी भंडारी, जय श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या प्रमुख जयश्री चौधरी, प्रहारचे सरचिटणीस अरुण जाधव, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष अविनाश वाघ, महाराष्ट्र सरचिटणीस रोहिणी वाघ, नासिक उपाध्यक्ष ज्योती परदेशी, नासिक संघटक सुवर्णा उदावंत, नाशिक दिव्यांग महिला जिल्हाध्यक्ष आरती भोज, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट च्या पदाधिकारी अश्विनी महाले, रुपाली वालझाडे, उपाध्यक्ष दिलीप गायकवाड तालुका उपाध्यक्ष राहुल मोरे, संघटक संजय बलकवडे, कार्याध्यक्ष श्याम डावरे, विजय देव्हारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली, दिव्यांग सक्षमीकरण सोहळ्यामध्ये स्थानिक पदाधिकारी एकनाथ लोखंडे सार्थक उगळे, मयूर बेंडकुळे, जनसेविका ज्योती गरुड, सुनीता गवळी, मनीषा गांगुर्डे, लिना गवळी, नितीन गवळी, उषा वाघ, सुवर्णा गवळी आदींनी कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये सहकार्य केले.
यावेळी समाज कल्याण विभागाकडून सहकार्यासाठी आलेल्या कविता जुनेजा यांनी दिवंग बांधवांसाठी उपयुक्त व आवश्यक उपकरणे व साहित्य यासाठी प्रशासनाकडे विनंती अर्ज कार्यक्रमाच्या ठिकाणी भरून घेतले तसेच उपस्थित दिव्यांग बांधवांचा व पदाधिकाऱ्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
यावेळी अरुण जाधव, जयश्री चौधरी, रोहिणी वाघ, ज्योती परदेशी, राखी भंडारी, कविता जुनेजा, विनायक पवार यांच्याकडून उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले व नाशिक भूषण अमोल भागवत यांनी मुख्यतः जोर देऊन दिव्यांग बांधवांना कधीही हार न मानण्याची वृत्ती जोपासावी, आपण आदर्श मानत असलेल्या महापुरुषांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याला उज्वल बनवावे असे आवाहन केले.
अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा प्रशासकीय सेवेत व भ्रष्टाचारी राजकारणी यांच्यामध्ये असलेला दबदबा या कार्यक्रमाच्या वतीने आवर्जून जाणवला.
तसेच अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे दिव्यांग जिल्हाध्यक्ष सूरदास पावसे यांच्या जन्मदिवस व महाशिवरात्री निमित्त उपस्थितांना उपवासाचे फराळ वाटप आणि दिव्यांग बांधवांना हातरूमाल व पर्स वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्राध्यापक विनायक पवार यांनी केले व आभार प्रदर्शन रोहिणी वाघ यांनी केले.