Homeशेतीअवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून* *शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी*...

अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून* *शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी*  *शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*

अवकाळीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून*
*शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी*
 *शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन*
नाशिक- नाशिक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक महानगर तसेच जिल्ह्यातील द्राक्ष डाळिंब लसुन हरभरा कांदा गहू हरभरा भाजीपाला आधी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी त्यामुळे अहवाल दिन झाला आहे त्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात भरपाई द्यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटातर्फे जिल्हाधिकारी गंगाधरण डी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली.
   गेल्यावर्षी अतिवृष्टी झाली त्याने  शेतकरी आदीच हवालदिल झाला आहे.त्यातून कसाबसा सावरत नाही तोच अवकाळी पावसाने गेल्या दोन दिवसांपासून नाशिक महानगरासह जिल्ह्यात एकच धुमाकूळ घातल्याने रब्बीच्या पिकांना त्याचा जोरदार फटका बसला आहे.शेतातील द्राक्षपिकांना त्याचा जोरदार फटका बसला.साठवून ठेवलेला कांदाही भिजू लागल्याने कांदा उत्पादकही चिंतेत सापडले आहे.हरबरा आणि गव्हाची काढणीचे काम सुरू असतांनाच अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ही पिके वाचविण्यासाठी त्याची धडपड सुरू झाली आहे.आंब्याचे मोहोर गळून पडल्याने आंबा उत्पादकांनाही मोठी झळ बसली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महानगर तसेच जिल्ह्यांतील पिंकाच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत आणि या घटकाला त्वरित न्याय द्यावा अशी आमची आपणास कळकळीची विनंती आहे.
   जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात शिवसेना उपनेते सुनील बागुल,सहसंपर्कप्रमुख दत्ता गायकवाड,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर,उपजिल्हाप्रमुख सचिन मराठे,महेश बडवे,कोर कमेटी सदस्य डी.जी.सूर्यवंशी,उपमहानगर संघटक विरेंद्रसिंग टिळे शिवसैनिक दिलीप शिरसाठ आदींचा समावेश होता
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!