Homeसामाजिक कामयुवक राष्ट्रवादी कडून मातीच्या माठांचे वाटप

युवक राष्ट्रवादी कडून मातीच्या माठांचे वाटप

महिला दिनानिमित्त मदत फाउंडेशन व युवक राष्ट्रवादी कडून मातीच्या माठांचे वाटप
नाशिक (दि.८ मार्च २०२३)
उन्हाची चाहूल लागली असून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने
पारंपारिक साधन मातीचे मडके हे थंड पाणी करण्यासाठी सोयीचे असल्याने महिला दिनानिमित्त मदत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अंबादास खैरे कडून मातीच्या माठांचे वाटप करण्यात आले.
माती म्हणजे अनेक मिनरल्स आणि पोषकघटकांचा खजिना आहे. आपल्याकडे पूर्वी मातीच्या मडक्यातून पाणी प्यायची सवय होती आणि कालांतराने तीच आपली परंपरा बनली. परंतु, आता मडक्याची जागा फ्रीजने घेतली असून फ्रीजच्या पाण्याने आजार जडतात. मातीच्या माठाला लहान लहान छिद्र (सच्छिद्र) असल्याने यातील पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते. माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीत मुबलक मिनरल्स आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते. त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात. यामुळे नागरिकांचे आरोग्य चांगले राहते. याच कारणाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून त्रिमुर्ती नगर येथे मदत फाउंडेशन व राष्ट्रवादी युवक काँग्रेस यांच्या वतीने महिलांना मदत फाउंडेशन चे संस्थापक अंबादास खैरे यांच्या हस्ते मातीच्या माठांचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील महिला, नागरिक व युवक मित्र परिवार मोठया संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!