Homeनाशिक लोकलकाळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला 96 वर्षे; पंचवटीत 2 मार्च रोजी भव्य अभिवादन...

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला 96 वर्षे; पंचवटीत 2 मार्च रोजी भव्य अभिवादन सभा

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाला 96 वर्षे; पंचवटीत 2 मार्च रोजी भव्य अभिवादन सभ

नाशिक लोकल : शिवाजी अढांगळे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 2 मार्च 1930 रोजी झालेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह या लढ्याला यंदा 96 वर्षे पूर्ण होत आहेत. मानवमुक्ती, समानता आणि सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या या आंदोलनाच्या स्मरणार्थ 2 मार्च 2026 रोजी पंचवटी परिसरातील गौरी पटांगण येथे भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह भूमिपुत्र अभिवादन समिती, नाशिक यांच्या वतीने ही सभा सलग 21 व्या वर्षी आयोजित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतीच पत्रकार परिषद घेण्यात आली. समितीचे स्वागताध्यक्ष किशोर घाटे व अध्यक्ष प्रकाश पगारे यांनी देशभरातील सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभेला यशस्वी करावे, असे आवाहन केले.

पत्रकार परिषदेत निमंत्रक बाळासाहेब गांगुर्डे, के. के. काळे, बाबासाहेब चव्हाण, जितेश शार्दुल, यश अल्हाटे, भीमश्री विजयराज पगारे, हनुमंत काळे, किशोर गांगुर्डे, सनी रोकडे, पंडित पाडमुख, नवनाथ काळे, अंकल डोळस, गौतम जाधव, माधव गायकवाड, दुष्यंत वाघ, दादाराव मिरेकर, भरत रोकडे आदींसह समितीचे पदाधिकारी व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या अभिवादन सभेत सामाजिक समता, बंधुता आणि संविधानिक मूल्यांचा जागर करण्यात येणार असून विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. ऐतिहासिक सत्याग्रहाच्या प्रेरणेने समाजात एकात्मता व समानतेचा संदेश दृढ करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!