Homeसामाजिक कामसुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकार प्रदीप शिंदे यांचा सन्मान

सुरक्षारक्षक गौरव सोहळ्यात चित्रकार प्रदीप शिंदे यांचा सन्मान

 

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प सुरक्षारक्षक आपली नियमित कामगिरी सांभाळत असताना समाजसेवी वृत्ती दाखवून इतरांनाही मदत करतात. याचा विचार करत युवा चित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना मुंबईच्या कोपरखैरणे येथे सुरक्षारक्षक गुणगौरव सोहळा कार्यक्रमात सन्मानित करून प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह बहाल करण्यात आले. यावेळी प्रदीप शिंदे यांच्यासोबत राज्यातील इतर सुरक्षा रक्षकांचादेखील सन्मान करण्यात आला.

कोपरखैरणे येथील मनपा शाळा क्रमांक ३१ मध्ये सुरक्षारक्षक गौरव सोहळा-२०२३ चे आयोजन प्रवीण विटेकर, सहआयोजक संतोष खामकर, दीपक चाळके यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी प्रदीप शिंदे यांनी चित्रकला व लिफ आर्टमध्ये उत्कृष्ट कामगिरी दर्शविल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून सुरक्षारक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके, सचिन गौरव नालींदे, कामगार प्रतिनिधी चंद्रकांत बोबडे, हनुमंत सुरवसे, अशोक पाटील, लक्ष्मणराव भोसले, अजिंक्य भोसले, असलम इनामदार, अशोक कळसकर, मकरंद होमने आदी उपस्थित होते.

सुरक्षारक्षक कामावर कर्तव्यदक्ष असताना त्यांनी केलेल्या चांगल्या कामाचे म्हणजे कंपनीमधील मालमत्तेची चोरी करतेवेळी चोराला पकडणे, कंपनीमधील जीविताचे प्रसंगावधान राखत रक्षण करणे आणि ज्या सुरक्षारक्षकांना समाजसेवा, कला, गुणकौशल्य यांसह विविध खेळांमध्ये पारितोषिक मिळाली असतील, अशा सुरक्षारक्षकांचा गुणगौरव सोहळा या माध्यमातून केला जातो. त्यात चित्रकार प्रदीप शिंदे यांचा सन्मान करण्यात आल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!