HomeUncategorizedदेवळाली छावनी परिषदेचे पाणी व रस्त्यांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे निवेदन

देवळाली छावनी परिषदेचे पाणी व रस्त्यांबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे निवेदन

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प

देवळाली छावणी परिषदेचे पाणीपुरवठा व रस्त्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी छावणी परिषद प्रशासनास निवेदन दिले.देवळाली छावनी परिषदेच्या वतीने काही दिवसांपासून पाणी पुरवठा उशीराने व कमी दाबाने केला जात आहे. तसेच लवकरच बंदही केला जातो. त्यामुळे छावनी परिषदमधील राहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने कोणत्याही प्रकारच्या पूर्व सूचना येथील नागरिकांना दिलेल्या नाही. पहिल्या मजल्यावर सुद्धा पाणी पोहोचत नाही. इतक्या कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. तसेच छावनी परिषदमधील एखादा अधिकारी रजेवर असल्यास त्याचा कार्यभार दुसरा कोणीही कर्मचारी करत नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाची सखोल चौकशी करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे आनंदरोडवरील सुरु असलेल्या रस्त्याच्या कॉक्रिटीकरण करणा-या ठेकेदाराने नवीन रस्त्याच्या तुलनेत ड्रेनेज नाल्याची संरक्षण भिंत खुपच कमी ठेवलेली आहे. याकडेही लक्ष देण्याबाबत प्रशासनाला कळविलेले आहे. याशिवाय रस्त्याच्या दुस-या बाजुला मऊ मुरुम टाकण्यात आला आहे. सदरचा मुरुम पावसाळ्यात अत्यंत धोकादायक व जिवघेणा ठरणार आहे. त्यामुळे वाहनधारकांना जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे. अपघात होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या ढिसाळ कारभाराबाबत राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रतन चावला यांनी पत्राद्वारे देवळाली छावनी परिषदेला कळविलेले आहे. त्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याबाबत विनंती केलेली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!