Homeमनोरंजनशेटे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.

शेटे महाविद्यालयाच्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप.

प्रमोद रहाणे l देवळाली कॅम्प:- श्री. एकनाथराव सहादू शेटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, देवळाली कॅम्प, यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचा समारोप उत्साहात पार पडला. शिक्षण मंडळ भगूर संस्थेचे कार्यवाह सचिन पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना व तिचे महत्त्व याविषयी आपले मौलिक विचार प्रकट केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व शिक्षण मंडळ भगूरचे सहकार्यवाह, महाविद्यालयाचे समन्वयक जितेंद्र भावसार यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना विद्यार्थी जीवनातील चांगल्या सवयींना विकसित करून भावी आयुष्यामध्ये यश संपादन करण्यासाठीचे मार्गदर्शन व आवाहन केले. भगूर शिक्षण मंडळाच्या कार्यकारणी सदस्या डॉ. हेमांगी पाटील यांनी देखील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामजीवनाशी कायमस्वरूपी नाळ टिकून ठेवावी. ग्रामीण भागासाठी कार्य सुरू ठेवण्याचे व सामाजिक जीवनात सक्रिय राहण्यासाठीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य भरत सपकाळे यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष बोडके व सहा. कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरज गंगावणे यांनी शिबिरा विषयाचे मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. मृत्युंजय कापसे यांनी करून दिला. कार्यक्रमास पिंपळगाव डूकरा गावच्या सरपंच सौ. मालतीताई वाकचौरे, उपसरपंच सौ. पूजा जाधव, शिक्षण मंडळ भगूर यांचे सदस्य भाऊसाहेब कडभाने, गणेश चव्हाण तसेच गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये पिंपळगाव डुकरा, ता. इगतपुरी याजकडून महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शिबिराचा समारोप जनजागृतीपर पथनाट्य व सांस्कृतिक कार्यक्रमाद्वारे झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अश्विनी ठाकरे तर आभार प्रदर्शन प्राध्यापक राहुल निर्मळ यांनी केले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!