Homeकारावाईजि.प.चा लाचखोर उपअभियंता अडकला जाळ्यात

जि.प.चा लाचखोर उपअभियंता अडकला जाळ्यात

नाशिक
काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याच्या बदल्यात 40 हजार रूपयांची लाच स्विकारणारा जिल्हा परिषदेच्या सुरगाणा उपविभागाचा उपअभियंता नंदलाल सोनवणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. पैसे घेतल्याशिवाय कामच होत नसल्याच्या तक्रारीला या लाचप्रकरणाने पुष्ठी मिळाली आहे.
तक्रारदार हा ठेकेदार असून त्यास जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग दोनकडून सुरगाणा तालुक्यातील दोन गावांना सिमेंट काँक्रिट रस्ता बनवण्याचे काम देण्यात आले होते. काम वेळेत आणि दर्जेदार होते कि नाही , हे पाहण्याची जबाबदारी उपअभियंता या नात्याने सोनवणे याची होती. अर्थात देखरेख करण्याचे अधिकारच दिलेले आहेत. मिळालेले काम संबंधित ठेकेदाराने मुदतीत पूर्ण केले. बील काढण्यासाठी ठेकेदाराला काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्राची गरज होती. हे प्रमाणपत्र सोनवणे याच्याकडून मिळणार होते. सोनवणे याने प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात 40 हजार रूपयांची मागणी केली. कामांची अंदाजपत्रकीय रक्कम 20 लाख असल्याने दोन टक्के याप्रमाणे 40 हजार रूपयांचा हिशोब सोनवणे याने लावला. वेळेत काम पूर्ण करूनही विनाकारण पैश्याची मागणी होत असल्याने वैतागलेल्या ठेकेदाराने यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. खातरजमा झाल्यानंतर सापळा लावण्यात आला. 40 हजार रुपये स्विकारताना सोनवणे यास रंगेहाथ पकडण्यात आले.

जिल्हा परिषद मुख्यालय असून याठिकाणीही लाच स्वीकारल्याच्या घटना घडल्या आहेत. तत्कालिन माध्यमिक शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्यासाठी लाच आठ लाख रूपये लाच स्वीकारताना एक कर्मचारी इमारतीच्या आवारात पकडला गेला होता. वर्ग एकचा अधिकारीच लाचप्रकरणात अडकल्याने त्यावेळी खळबळ उडाली होती. त्यानंतर ग्रामीण पाणी पुरवठा विभागातही एक उपअभियंता खुर्चीत बसून लाच स्वीकारताना सापळ्यात अडकला होता.लाचखोर सोनवणे प्रकरणाने या घटनांना पुन्हा उजाळा मिळाला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!