Homeकारावाईरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निवेदन.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निवेदन.

बिग बॉस मराठी सिझन 5 असा रिऍलिटी शो सद्धया मराठी चॅनेल वर सुरु असून त्यामध्ये भारत देशाची शान, निर्व्यसनी तरुणांचे प्रेरणास्थान संग्राम चौघुले जी यांना वाइल्ड कार्ड एन्ट्री दिली त्यामध्ये निकी तांबोळी नामक अभीनेत्री आणि अरबाज नामक व्यक्ती हे संग्राम चौघुले जींचा अतिशय निंदनीय अश्या प्रकारे अपमान करत असल्याचे सर्वच महाराष्ट्राने पहिले आहे त्याबद्दलचे बिग बॉस च्या सोशल मीडिया च्या पेग वर सुद्धा बऱ्याच भारतीयांनी अतिशय वेदनादायी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्या मध्ये हे दोघे बिनडोक लोक संग्राम चोघुले जीं ना गुडघ्यात नाहीतर तळव्यात अक्कल आहे आणि बरेच न सांगता येण्यासारखे चुकीच्या भाषेचे वक्तव्य करून अपमान केला आहे.

ही निकी तांबोळी bigboss ला आवाहन करते की इकडे एखादा रॉकेट किंवा बॉम्ब पाठवायचा होता ही सुतळी लवंगी संग्राम ला इकडे का पाठवलेले आहे.
या सबंधित या निकी तांबोळी आणि अरबाज या दोघांवर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करावी.आणि जर का बिगबॉस रिऍलिटी शो वाले यांची बाजू मांडत असतील तर यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात यावी ही कळकळीची विनंती.

सध्या मुंबई पोलीस दलात नव्याने LPC जॉइनिंग झालेली पूजा चव्हाण हिच्या बद्दल एका महिलेची तक्रार आलेली असून त्यांचे म्हणणे आहे की सदर पिडीत महिलेच्या पती पूजा चव्हाण हिने बरोबर बेकायदेशीर केलेले आहे आणि आता तर मी पोलीस खात्यात आहे तुला आयुष्यभर जेल मध्ये सडवेल अश्या धमक्या पूजा चव्हाण ही पिडीत महिलेला देते.
मुख्य म्हणजे पिडीत महिला ही आपल्याच पोलीस दलात महाराष्ट्र पोलीस सातपाटी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस अधिकारिंच्या सख्ख्या ताई आहेत.
पूजा चव्हाण ही मरोळ headquaters ला LPC म्हणून कार्यरत आहे, तसेच हिने बेकायदेशीर लग्न केलेले असून नोकरी च्या ठिकाणी लग्न झालेले नाही असे खोटे सांगून या ठिकाणी सुद्धा सरकारी नोकरी साठी कायद्यासोबत गैरव्यवहार केला आहे.
सदर महिलेचे बेकायदेशीर लग्न केलेल्या व्यक्ती सोबतचे फ़ोटो सुद्धा मी सोबत जोडत आहे त्यामध्ये पूर्ण विवाहित महिलेच्या पोशाख आणि श्रींगार पूजा चव्हाण ने पारीधान केला आहे.
तरी या ठिकाणी तात्काळ हिच्या निलंबणाची कारवाई झाली पाहिजे . असे निवेदन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या आठवले गटाने दिले आहे. प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश मातेकर महाराष्ट्र राज्य महिला आघाडी उपाध्यक्ष वर्षा म्हस्के कांबळे व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!