HomeUncategorizedवाचाळवीर चंद्रकांत पाटलाचा निषेध: करण गायकर

वाचाळवीर चंद्रकांत पाटलाचा निषेध: करण गायकर

कर्मवीर भाऊराव पाटील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांनी भीक मागून शिक्षण संस्था उभ्या केल्या असे वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे तंत्र व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसापूर्वी केले होते. याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर उसळले पिंपरी चिंचवड दौऱ्यावर असताना एका आंबेडकरी अनुयायाने चंद्रकांत पाटलांवर शाई फेक केली. महापुरुषनबाबत चुकीचे विधान केले म्हणून अखा महाराष्ट्र खवळून गेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेतले म्हणून कार्यकर्त्यांची सूदभुध उडाली होती फेसबुकच्या माध्यमातून चंद्रकांत पाटलाला चंपाबाई म्हणून अख्ख फेसबुक वरून टोल केलं . हातात पेन घेतला म्हणून तलवार चालवायचं विसरलो नाही असं आंबेडकरी अनुयायांनी फेसबुक वर खणकावून सांगितलं. चंद्रकांत पाटलान विरोधात ठिकठिकाणी आंदोलन झाली मोर्चे काढले गेले चंद्रकांत पाटलांच्या चित्रांना चप्पल जोड्यांनी महाराष्ट्रात मारहाण केली. हा जनतेचा आक्रोश होता. यातच आता छ*** संघटना ही ऍक्टिव्ह बोर्ड मध्ये आली आहे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर यांनीही चंद्रकांत पाटलांचा नाशिक मधून निषेध केला आहे. करण गायकर यांनी चंद्रकांत पाटलांना चक्क वाचाळ वीर असं म्हटलं आहे. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विरोधात जर आपण अपशब्द काढला तर आम्ही आपला समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही अशी भूमिका आता करण गायकर यांचे आहे. स्वराज्य संस्थेच्या मार्फत आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा देतो की यापुढे असे वाचाळ वक्तव्य जर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून झाले तर स्वराज्य संघटना गप्प बसणार नाही महाराष्ट्रात आक्रमकपणे आम्ही आंदोलन करू आणि समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!