HomeUncategorizedमनपा च्या वतीने स्वच्छता अग्रणी महिला पुरस्कार २०२३

मनपा च्या वतीने स्वच्छता अग्रणी महिला पुरस्कार २०२३

मनपा च्या वतीने
*स्वच्छता अग्रणी महिला पुरस्कार २०२३*

नाशिक : विशेष प्रतिनिधी

केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून दिनांक ०७ मार्च ते ३० मार्च २०२३ या कालावधीत महिलांचा स्वच्छतेमधील सहभाग व त्यांचे स्वच्छतेमधील नेतृत्व वृद्धींगत करण्यासाठी ” स्वच्छोत्सव २०२३ ” अभियान राबविण्याचे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत . या अभियानमधील एक घटक म्हणून स्वच्छतेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना Womens Icons Leading Swachhata ( WINS ) Award -२०२३ या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे . सबब सदर पुरस्कारासाठी पात्र व्यक्ती / संस्था यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे. याबाबत अर्जाचा नमुना, अर्ज सादर करण्याची पद्धत व मुदत ई बाबतचा संपूर्ण तपशील www.nmc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्याचे संपूर्ण अवलोकन करून व त्यात नमूद सूचनांनुसार आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांनी आपले अर्ज विहित मुदतीत सादर करावेत. अधिक माहितीसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग ( मुख्यालय ) अथवा ९९ ७०४३४२५ ९ , ७०२००४३६११ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहान डॉ. कल्पना कुटे
संचालक, घनकचरा व्यवस्थापन विभाग
नाशिक महानगरपालिका, नाशिक

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!