सध्याचे सरकार नपुंसक शक्तीहीन – विरोधी पक्ष नेता अजित पवार
नाशिक : शहर
सध्याचे सरकार हे नपुंसक व शक्तीहीन सरकार असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले. गुरुवारी (दि३०) राष्ट्रवादी भवन येथे आयोजित पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते. यावेळी माजी आ हेमंत टकले, आमदार माणिक कोकाटे, माजी खा समीर भुजबळ, आ सरोज आहिरे, जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, माजी आ अपुर्व हिरे आदी सह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की,
गारपीट ने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदती मिळालेली नाही. शेतकर्यांना कुठल्याही प्रकारची कर्जमाफी सरकारने केली नाही. हया सरकारचे आयात निर्यात धोरण ठरवलेले नाही. आज शेतकर्यांना दिल्लीत कोणाचा आधार आहे का. हे सरकार 500 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च करत आहे. सिलेंडर खतांचे भाव कमी केले नाही. नवीन महामंडळ हया कंपन्या बनवुन बनावा बनवी चालू आहे . युपीए सरकारच्या काळात शरद पवारांनी सर्व शेतकर्यांचे कर्ज माफ केले गेले . हे सरकार उद्योजकांचे कर्ज माफ करते. मग शेतकर्यांचे कर्ज सरकार का माफ करत नाही.
. महाविकास आघाडी राज्यात एकत्र आहे. मा पक्षाचा खरा कणा एकत्र आला पाहिजे. यासाठी महाविकास आघाडी राज्यभरात सभा घेणार आहे . २ एप्रिल संभाजीनगर ,
. १ में मुंबई , १४ मे पुण्याला सभा, १६ एप्रिल नागपुर , 3 जूनला नाशिक सभा घेत आहे.
जातीय सल्लोखा ठेवा , सणाच्या निमित्ताने राजकीय पोळी भाजण्याचे प्रकार चालू आहे. सर्व महापुरुषा बदल आदर ठेवा . मताच्या वेळेस महापुरुष आठवतात का . बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेने बदल काय घडले हे
जनतेच्या मनाला रुचले नाही . यांच्या सभेला एसटी महामंडळाच्या बसेस आणुन १० करोड बिल दयावे लागतात.
नव्या पिढीला संधी दया सत्ताधारी कडे अमाप संपत्ती आहे. याचा विचार करा. सर्व सामान्य पर्यत जे काही चालले आहे ते पोहचवले पाहिजे. संघटन मजबूत केले पाहिजे नव्या चेहऱ्यांना संधी दिली पाहिजे. जन माणसात विश्वास निर्माण केला पाहिजे. निवडणुकीच्या जेव्हा जाहिर होतील तेव्हा होतील आपण आता पासुन कामाला लागले पाहिजे. आरोग्याची काळजी घेत पक्षाचे कामकाज करण्याचा सल्ला पवारांनी राष्ट्रवादी च्या पदाधिकारी यांना दिला.