गुरुवार दि 25 एप्रिल रोजी मुंगसरे ता. जि. नाशिक येथील रहिवासी असलेले संतोष मोतीराम फडोळ ( वय 43) हे शेतातील घराजवळ रात्रीच्या जेवणानंतर शतपावली करत असतांना लघु शंकेसाठी बाजूला उभे राहिले असता त्यांचा चुकून सापावर पाऊल पडल्याने सापाने त्यांच्या पायाला चावा घेतला, अचानक पणे झालेल्या सर्पदंशाने संतोष यांना भोवळ आली व ते खाली पडले. बराच वेळ होऊन ही संतोष घरात न परतल्याने कुटुंबियांनी बाहेर बघितले असता त्यांना ते जमिनीवर पडल्या चे दिसले. कुटुंबीय त्यांना तातडीने दवाखान्यात घेऊन गेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
फडोळ परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असतांना घरातील एकमेव कर्ता पुरुषाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याने दुसर्या कोणात्याही कुटुंबातील सदस्य सर्पदंशाने मृत्यू मुखी पडू नये या भावनेतून वेगळे पाऊल टाकत जनजागृती साठी फडोळ परिवाराने स्वतः पासून सुरुवात करत दशक्रिया विधी च्या दिवशी -.ठ.ए.-.ड. फाउंडेशन यांच्याशी संपर्क साधत शून्य सर्पदंश जनजागृती अभियान कार्यक्रमाचे आयोजन केले. नाशिक पश्चिम वनविभागाचे सहायक वन संरक्षक अनिल पवार,वनपरीक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली -.ठ.ए.-.ड. फाउंडेशन संस्थेचे सुशांत रणशूर सर्पअभ्यासक ओझर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून आपल्या कडे आढळणारे प्रमुख चार विषारी साप, त्यांचे विषाचे प्रकार,सर्पदंश टाळण्यासाठी उपाय योजना,सर्पदंश झाल्यानंतर करावयाचे प्रथमोपचार यावर कृतीशील माहिती देत उपस्थित नागरिकांचे प्रबोधन केले. या प्रसंगी रणशूर यांच्या सोबत आलेले संस्थेचे सर्पअभ्यासक अमोल सोनवणे चितेगावं,दत्तात्रय देशमाने गंगापूर गावं,विक्रम कडाळे देवळाली कॅम्प, गौरव देशमाने गंगापूर गावं यांनीही उपस्थितांना प्रात्यक्षिक करून दाखवत मदत केली. प्रसंगी उपस्थित जन समुदायास साप, बिबट्या प्राण्याविषयी माहिती असलेले पत्रक वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते साहेबराव म्हैसधुणे, ,डव्होकेट जगदीश शिंदे,किरण फडोळ, कैलास मटाले, बापूशेठ भोर, ओमकार म्हैसधुणे, दीपक कडाळे, दीपक भोर, भाऊसाहेब म्हैसधुणे, शिवाजी भोर, डव्होकेट संदिप शिंदे, सचिन म्हैसधुणे, शरद नाना उगले, गुलाब म्हैसधुणे, दीपक म्हैसधुणे यांनी मोलाचे सहकार्य केले. नाशिक चे माजी महापौर दशरथ पाटील व माजी पं. स. सभापती विष्णुपंत म्हैसधुणे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त करताना शून्य सर्पदंश अभियान कार्यक्रमाची प्रशंसा करत उपस्थित शेतकरी व स्तरातील नागरिकांना कार्यक्रमात मिळालेल्या माहिती चा आपल्या दैनंदिन जीवनात वापर करण्याची विनंती केली. तसेच प्रवचनकार ह.भ.प. रामनाथ महाराज धोंगडे, दुगाव. यांनी सुद्धा सर्पमित्रांच्या समाज प्रबोधनाच्या संकल्पनेचे कौतुक करत समाजाला अशा प्रवचनांची नितांत गरज असल्याची बाब प्रसंगी उपस्थित असलेल्या जनसमुदाया समोर मांडली.
या कार्यक्रमा वर प्रतिक्रिया देताना मुंगसरे गावचे सरपंच रामदास बाळासाहेब उगले म्हणाले :- सर्पदंशाने मृत्यू होणे ही अत्यंत दुर्दैवी घटना आमच्या गावात प्रथमच घडली असून या पुढे अशा घटना टाळण्यासाठी आम्हीं प्रयत्नाची पराकाष्टा करुन गावातील किंवा पंचक्रोशीतील एकही व्यक्ती वर असा प्रसंग ओढवू देणार नाहीत त्याची सुरुवात आज फडोळ परिवाराने करून दिली. शून्य सर्प दंश जनजागृती कार्यक्रमातून मोठया प्रमाणावर जनजागृती आज झाली आहे. असे समाज प्रबोधन व जीवन मृत्यू शी संबंधित असलेले कार्यक्रम आम्हीं नेहमी आयोजित करू.